campaign

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य

सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अगदी तळागाळापासून आपल्या कामाला सुरुवात करून ते गेल्या 23 वर्षांपासून संघटनात्मक आणि निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत.

यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले असून ते दोनदा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. शहर विकास, युवा समस्या आणि महिला सक्षमीकरण यावर त्यांचा विशेष भर असून आणि दर्जेदार शिक्षण, सुलभ आरोग्य सेवा आणि उद्योजकतेला ते प्रोत्साहन देतात. लोकप्रतिनिधींच्या जनतेप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचे ते पुरस्कर्ते असून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कामाची जास्तीत जास्त माहिती मतदारसंघातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

मोठ्या प्रमाणात असलेला जनाधार, एकमत घडवून आणण्याची क्षमता आणि विकासाच्या दृष्टीसह तळागाळातल्या लोकांशी जोडले जाण्याची आवड यांमुळे बऱ्याचदा त्यांच्या नेतृत्वशैलीची तुलना श्री. विलासराव देशमुख यांच्याशी केली जाते.

27 सप्टेंबर 1983 रोजी संगमनेर येथे जन्मलेल्या सत्यजीत तांबे यांनी पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित अशा हार्वर्ड विद्यापीठाच्या केनेडी स्कूल ऑफ गवर्नमेंट येथून पब्लिक पॉलिसी (Public Policy) या विषयात उच्चशिक्षण घेतले आहे. त्यांना वाचनाची व प्रवासाची खूप आवड असून आपल्या फिटनेसबद्दलही ते नेहमी सजग असतात. त्यांचा विवाह डॉ. मैथिली तांबे यांच्याशी झाले असून त्यांना दोन अपत्ये (एक मुलगी आणि एक मुलगा) आहेत. त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी तीन वेळा विधानपरिषदेचे सदस्यपद भूषविले आहे आणि त्यांचे मामा बाळासाहेब थोरात हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आजवर अनेक महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली आहेत.